जगातील अग्रगण्य सर्च इंजिन ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचई यांना बढती मिळाली असून ते आता गुगलची पॅरंट कंपनी असलेल्या ‘अल्फाबेट’चेही (Alphabet) मुख्य कार्यकारी अधिकारी पदी (सीईओ) नियुक्ती झाली आहे.ही जबाबदारी आतापर्यंत ‘गुगल’चे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्याकडे होती. मात्र, मंगळवारी लॅरी पेज यांनी पदउतार होत असल्याची घोषणा केली. सह-संस्थापक सर्गेई ब्रिन यांनी देखील ‘अल्फाबेट’चे अध्यक्ष म्हणून पद सोडण्याचे जाहीर केले,त्यामुळे हे पद रद्द केले असून अल्फाबेटच्या सीईओपदाची जबाबदारी सुंदर पिचई यांच्या खांद्यावर आली.परिणामी एकाचवेळी दोन कंपन्यांचे सीईओ म्हणून पिचई काम पाहणार आहेत.
गुगलने २०१५ मध्ये कंपनीच्या स्वरूपात मोठा बदल करताना अल्फाबेटची स्थापना केली होती.अल्फाबेट ही विविध कंपन्यांचा समूह असलेली कंपनी आहे. अल्फाबेट गुगलला वायमो (चालकरहित कार) व्हेरिली (जैव विज्ञान) कॅलिको (बायोटेक आर एंड डी) आणि लू न ( फुग्याच्या सहाय्याने ग्रामीण क्षेत्रात इंटरनेटची उपलब्धता) यांसारख्या इतर संस्थांपासून वेगळे ठेवते. हे सर्व गुगलचे मूळ व्यवसाय नाहीत.

सर्गेई ब्रिन नव्या बदला नंतर आणि गुगलचे दुसरे सह संस्थापक लॅरी पेज कंपनीमध्य सहसंस्थापक, शेअरधारक आणि अल्फाबेटचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून कायम आहेत. पिचई यांना दुसरीकडे गुगल आणि अल्फाबेट या दोन्ही कंपन्यांचे सीईओ केले आहे. या बरोबरच पिचई अल्फाबेटचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून देखील कायम असतील.

गुगल आणि आता अल्फाबेटचे सीईओ म्हणून काम पाहणाऱ्या सुंदर पिचाई यांचा जन्म १० जून १९७२ रोजी तामिळनाडूच्या मदुराई येथे झाला. प्राथमिक शिक्षण चेन्नईत घेतल्यानंतर त्यांनी आयआयटी खडगपूर येथून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. त्यानंतर स्टॅंनफोर्ड विद्यापीठातून आणि पेन्सिल्वेनिया विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण केले. २००४ मध्ये ते गुगल कंपनीत रुजू झाले आणि २०१५ मध्ये यांची गुगलच्या सीईओपदी नियुक्त झाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा