जगातील सर्वांत मोठ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सुंदर पिचई यांची नियुक्ती झाल्यानंतर जगभरातील उद्योजकांकडून, गुंतवणूकदारांकडून, दिग्ग्जांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुंदर पिचई गुगलच्या सीईओ पदी नियुक्त झाल्यानंतर सर्वाधिक चर्चेत आले. त्यांच्याविषयी काही माहिती जाणून घेऊ :

  • सुंदर पिचई यांचे खरे नाव पिचई सुंदरराजन असे आहे.
  • सुंदर पिचई सकाळी साडे सहा ते सातच्या दरम्यान उठून चहा, टोस्ट, ऑम्लेट असा नाश्ता करतात. सकाळचा चहा शक्यतो चुकवत नाहीत. चहा हे त्यांचे आवडते पेय आहे.
  • मुलाचे भारतीय वंशाचे विशेषतः दक्षिण भारतातील असल्याने तिखट पदार्थांमधील सांबार, सर्व भाज्यांचे पायसम आणि गोड पदार्थांमध्ये खीर असे पदार्थ आवडतात.
  • दररोज कामाला सुरवात करण्यापूर्वी पिचई ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि न्यूयॉर्क टाइम्स वाचतात. जगभरातले असंख्य युजर्स बातम्यांसाठी गुगलवर जातात, तर पिचई वॉल स्ट्रीट जर्नल’ची मुद्रित आवृत्ती वाचतात.
  • पिचई व्यायामासाठी शक्यतो संध्याकाळी जिममध्ये जातात. दिवसभर संपूर्ण कार्यालयात ते चालत फिरतात.
  • पिचई घरात २०-३० स्मार्टफोन वापरतात अर्थातच वेगवेगळ्या टेस्टिंगसाठी. एवढ्या प्रचंड मोठ्या कंपनीचे सीईओ असून देखील त्यांचा पहिला स्मार्टफोन २००६ मध्ये खरेदी केला. यापूर्वी ते १९९५ मध्ये घेतलेला ‘मोटोरोला स्टार्टटॅक’ हा होता.
  • त्यांच्या कारकिर्दीत बऱ्याच इतर क्षेत्रात कामाच्या संधी खूप आल्या परंतु त्यांची पत्नी अंजली यांच्या सल्ल्याने गुगलमध्येच कायम राहण्याचा निर्णय घेतला. पत्नी अंजली आणि सुंदर पिचई यांची भेट खरगपूर आयआयटीमध्ये झाली. अंजली आणि सुंदर पिचई यांना काव्या-किरण या दोन मुली आहेत.

गुगलच्या मूळ कंपनीच्या सीईओपदी सुंदर पिचई

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा