नवी दिल्ली : ‘सनातन संस्था महाराष्ट्रात दहशतवाद पसरवत असून डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत त्यांचा सहभाग आहे,’ असा आरोप करून या संस्थेवर बंदीची मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी महाराष्ट्रातील नव्या सरकारकडे केली.’सनातन’चे प्रमुख आठवले यांनाही तुरुंगात पाठवले पाहिजे,’ असे त्यांनी म्हटले.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.कोरेगाव-भीमा प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले.’भीमा कोरेगाव प्रकरणात विनाकारण काही लोकांना गोवण्याचे काम केले केलेल आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचारात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचा थेट सहभाग होता. मात्र, ते विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करणारे असल्याने त्यांना वाचवण्याचे काम केले गेले. हे दोघे दहशतवाद पसरवणारे लोक आहेत.नव्या सरकारने त्यांच्याबाबत ताबडतोब भूमिका घेण्याची गरज आहे,’ असे मत त्यांनी मांडले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘जयंत पाटील यांनी आता भिडेंची बाजू घेऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे. सांगलीतील दंगलीच्या वेळी देखील मी हीच भूमिका घेतली होती. आताही मी त्यांना हेच सांगेन,’ असे दलवाई म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा