हैदराबाद : २७ वर्षीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या झाली. या प्रकरणाने देशभरात तीव्र पडसाद उमटत असून लोकप्रिय नेमबाज हिना सिद्धूने देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र बाळगण्याचा परवाना द्या,अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.

देशभरात होत असलेल्या महिलांवरील अत्याचारावरून हिना सिद्धूने सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली.शस्त्रास्त्र कायद्यात सुधारणा करण्याऐवजी देशातील प्रत्येक महिलेला शस्त्र बाळण्याचा परवाना देऊन शस्त्र बाळगणे सक्तीचे करावे,अशी थेट मागणी हिनाने ट्विट करत केली.

लोकांनी परवाना असलेली शस्त्रे बाळगणे ही समस्या नसून आम्हाला सुरक्षित प्रवास करता आला पाहिजे, सुरक्षितपणे नोकरीच्या ठिकाणी जाता आले पाहिजे, सुरक्षितपणे कामावरून घरी परतता आले पाहिजे. आम्हाला आमचे संरक्षण स्वत: करता यायला हवे, कारण पोलीस आणि इतर संरक्षक दले हे आमच्यासाठी नाहीत. जेव्हा एखादी झुंड एखाद्या महिलेविरुद्ध असते तेव्हा तिच्यासाठी त्यावेळी शस्त्र हाच एकमेव पर्याय असतो,असे हिनाने आणखी एका ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटले.

पुन्हा निर्भया (अग्रलेख)

बिहार : सामूहिक बलात्कारानंतर तरुणीला जाळले

हैदराबाद प्रकरणाचा असा लावला छडा

सोनई हत्याकांड: पाचजणांची फाशी कायम

संसद अधिवेशनात जया बच्चन संतापल्या

हैदराबाद बलात्कार प्रकरण : सुनावणी ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात

हैदराबाद घटनेचा तीव्र निषेध

हैदराबाद : देशभरात संतापाची लाट

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा