बक्सर : हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बिहारमध्येही तशीच घटना उघडकीस आली आहे. बिहारमधील बक्सरमध्ये तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्यात आले. अवघ्या काही दिवसांत अशा धक्कादायक घटना उघडकीस आल्याने देशात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ही तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयानी दिली होती. पीडित मुलगी घराच्या बाहेर उभी असताना दोन तीन अज्ञात लोकांना पीडितेसोबत बोलताना तिच्या कुटुंबीयांनी पाहिले परंतु, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. काही वेळानंतर मुलगी व तिच्यासोबतचे अज्ञात लोक न दिसल्याने कुटुंबीयांनी मुलीची शोधाशोध सुरू केली. मात्र ती सापडत नसल्याने कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली.

त्यानंतर एका अज्ञात नंबरवरून ‘मुलगी आता घरी येणार नाही,’ असे सांगणारा दूरध्वनी आला. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी कुकुढा गावाजवळ मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. तिचे शवविच्छेदन केल्यावर ‘सामूहिक बलात्कारानंतर तिची गोळी झाडून हत्या करण्यात आली व नंतर तिला पेटवून दिले,’ अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

वाचा : हैदराबादमधील घटनेचा तीव्र निषेध

हैदराबाद बलात्कार प्रकरण : सुनावणी ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा