तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असाल आणि तुम्हाला पथकर (टोल) भरायचा असेल तर मग 1 डिसेंबरपासून तुमच्याकडे ‘फास्टॅग’ असणे गरजेचे आहे. वाहनावर फास्टॅग लावण्याची जबाबदारी वाहन निर्मात्याची किंवा वाहन विकणार्‍या अधिकृत डीलरची असणार आहे, याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

फास्टॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. कारच्या पुढच्या काचेवर हा टॅग लावावा लागेल. पथकराची रक्कम टॅगशी जोडलेल्या प्री-पेड अकाऊंट वा बँक खात्यामधून कापली जाईल. या टॅगच्या मार्फत ‘कॅशलेस’ पद्धतीने पथकर भरण्याकडे लोकांचा कल वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. जर 15 डिसेंबरपर्यंत गाडीला फास्टॅग लावून घेतला नाही, तर त्यानंतर या व्यक्तीला पथकर नाक्यावर कदाचित दुप्पट पथकर भरावा लागू शकतो. या फास्टॅगची वैधता खरेदी केल्यानंतर पाच वर्ष आहे.

काय आहेत फास्टॅगचे फायदे :

फास्टॅगमुळे टोल नाक्यांवरची गर्दी कमी होईल.
गाड्या न थांबता पथकर नाका पार करतील.
प्रवाशांचा वेळ वाचेल.
गाड्या खोळंबून न राहिल्याने प्रदूषणही काहीसे कमी होईल.
सरकारकडे प्रत्येक गाडीचा डिजिटल रेकॉर्ड तयार होईल.
एखादी गाडी ट्रॅक करणेही यामुळे सोपे जाईल.
सुट्ट्या पैशावरून होणारा वाद टळेल.
वाहन चालकांना खर्चाचा आढावा घेणे सोपे जाईल.

कुठे मिळेल फास्टॅग ?
लोकांना सहजपणे फास्टॅग विकत घेता यावा, यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. बँका, इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यासारख्या ठिकाणी फास्टॅगच्या विक्रीसाठी 18 नोव्हेंबरपर्यंत 28,500 विक्री केंद्रे उभारण्यात आली आहेत. यासोबतच आरटीओ कार्यालय, सर्व सेवा केंद्रे, वाहतूक केंद्रे आणि काही निवडक पेट्रोल पंपांवरही हे फास्टॅग उपलब्ध आहेत. फास्टॅग हे अ‍ॅमेझॉन, पेटीएम, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, एचएडीएफसी बँक यांच्या वेबसाईटवरून ऑनलाइनही विकत घेता येतील.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा