मुंबई :आशियामधील नकारात्मक वातावरणाचा प्रभाव भारतातील शेअर बाजारावर आज दिसला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पहिल्या सत्रात १९० अंकांनी घसरला. सध्या तो ४० हजार ६०० पॉइन्टवर व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ७० पॉइन्टची घसरण झाली असून तो १२ हजारच्या पातळीखाली आला. निफ्टी ११ हजार ९७५ पॉइन्टवर व्यवहार करत आहे.

बाजार उघडताच सेन्सेक्सने १२० पॉइन्टची झेप घेतली होती. मात्र त्यानंतर बाजारात विक्री सुरु झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकचे शेअरवर दबाव दिसला. पीएनबी, बीओबी, सिण्डिकेट, युनियन बँक हे शेअर घसरले.दरवाढीची घोषणा केलेल्या व्होडाफोन आयडियाचा शेअर स्थिर होता मात्र भारती एअरटेलच्या शेअरमध्ये घसरण झाली.सेल, टाटा स्टील, जेएसडब्लु स्टील आदी शेअर घसरणीसह व्यवहार करत आहे. रिजर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरु असून त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा