येरवडा : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरू असताना राज्य सचिवांनी राज्यपालांची सही घेऊन राज्याचा हिवताप निर्मूलन विभागच जिल्हा परिषदकडे वर्ग केले होते. या निर्णयाच्या विरोधात राज्यातील महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेने येरवडा येथील सहसंचालक आरोग्य सेवा कार्यालयाच्या समोर आंदोलन केले. यात बरेच आधिकारी व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

हिवताप निर्मूलन विभागच आता जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अंतर्गत कामकाज करणार असल्याचा निर्णयाचे प्रशासनाने परिपत्रक २२ नोव्हेंबरला काढले. म्हणजेच राज्य शासनाची कर्मचारी आता जिल्हा परिषदेची कार्मचारी झाली असून राज्यात हिवताप निर्मूलनाचे कामकाज करताना बऱ्याच अडचणी येणार आहेत,या विरोधात घेतलेला निर्णय राज्य शासनाने तत्काळ रद्द करावा. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीने आरोग्य सेवा सहसंचालक कार्यालयाच्या समोर आंदोलन केले.
या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ, खांदेश, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र या भागातील हजारो कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले. सहसंचालक कार्यालयाच्या बाजूस कडक पोलिस बंदोबस्त ठेवला असून याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील अधिकारी व कर्मचार्‍यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेकडे हा विभाग हस्तांरण केले. याला सर्व जिल्हातील लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला. हा निर्णय घेऊन प्रशासनाने परिपत्रक काढले. मात्र प्रशासनाला काय साध्य करावयाचे आहे हेच कळत नसल्याचे आंदोलन कर्त्यांनी म्हटले.

महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय किटकजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात येणारे कामकाज उपलब्ध मनुष्यबळ त्याच्या कामाचे स्वरूप केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना जिल्हा निहाय ए.पी.आय.इंडेक्स व अनुषंगीक न्यायलयीन प्रकरणे याचा तपशीलवार सर्वकष आढावा घेतला.तसेच प्रशासकीय कामकाज करताना जिल्हा हिवताप अधिकारी किंवा संबधित क्षेत्रीय कार्यालयाकडून निष्काळजीपणा व गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय शासनाच्या विचाराने घेतला. यामुळे हे परिपत्रक काढल्याचे म्हटले.

परंतू राज्याच्या हिवताप निर्मूलन करताना बऱ्याच अडचणी येणार आहेत. शिवाय राज्याची कर्मचारी म्हणून नेमणूक झालेल्या कर्मचार्‍या सरळ स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे जिल्हा परिषदेचे कर्मचारी म्हणून वर्ग केलेली ही बाब सर्व राज्यातील कर्मचारी व अधिकार्‍यांना अमान्य असल्याने आमच्या हक्कासाठी उपोषण करत असल्याचे सर्व संघटनेच्या कर्मचारी व अधिकार्‍यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाजीराव कांबळे, सरचिटणीस पी.एन.काळे,तसेच व्ही.पी.बनकर ( अहमदनगर ),सुनिल साखरे (बीड),आर.डी.चव्हाण (रायगड )साहेबराव कांडेकर (नाशिक),बी.व्ही.वाघमारे ( सोलापूर ), जे.एम. गोपाळे( पुणे ), पी.एस.डांगे ( नांदेड), आर.धुतडमल (औरंगाबाद), के.एफ.गवस (कोल्हापूर), एम.के.पठाण( लातूर ),ए.एन.पुळसकर ( ठाणे), राजेंद्र दाडेंकर ( अकोला), ए.आर.खडके ( पंढरपूर ), पी.सी.कुलकर्णी (सातारा) तसेच राज्याच्या अनेक भागाती कर्मचारी व अधिकारी,पदाधिकारी मोठ्यस संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रशासनाच्या विरोधात येरवडा येथील सहसंचालक आरोग्य सेवा कार्यालयाच्य समोर महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेने पदाधिकारी आंदोलन करताना
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा