वॉशिंग्टन : भारताच्या बहुचर्चित चांद्रयान-२ मोहिमेतील महत्त्वाचा भाग असणाऱ्या ‘विक्रम लँडर’चा ठावठिकाणा शोधण्यात यश आले आहे. ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने भारतीय अभियंत्याने दिलेल्या माहितीच्या जोरावर ही कामगिरी फत्ते केली.

‘नासा’ने मंगळवारी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. नासाच्या ऑर्बिटरनं (एलआरओ) चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या खाणाखुणा शोधून काढल्या आहेत. चंद्रावरील सपाट भूमीवर उतरत असताना विक्रम लँडर जिकडे आदळले तिथपासून ७५० मीटर लांब अंतरावर विक्रम लँडरचे तीन अवशेष आढळल्याचा दावा नासाने केला आहे. एक किलोमीटर अंतरावरून नासाने विक्रम लँडरची छायाचित्र टिपली आहेत.

अधिक वाचा : भारतीय अभियंत्याने लावला विक्रम लँडरचा शोध

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा