नवी दिल्ली: एचडीएफसी बँकेचे ग्राहक बँकेच्या नेट बँकिंगमुळे त्रस्त आहेत. सोमवारपासून नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग ऍप ऍक्सेस करता येत नसल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच ही तांत्रिक अडचण आल्याने लोकांना बिलांचा भरणा आणि अन्य व्यवहार करताना त्रास होत आहे.
नेटबँकिंग सेवा सोमवारीही देखील काही तास बंद होती. एचडीएफसी बँकेने सायंकाळी ६.१५ वाजता आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली. तांत्रिक कारणाने ही समस्या निर्माण झाली होती, आणि या बिघाडाची कल्पना आम्ही ग्राहकांना आधीच दिली होती. रात्री उशिरापर्यंत बँकेला ही सेवा सुरळीत करता आली नव्हती. एचडीएफसीने ट्विट केले,’तांत्रिक बिघाडामुळे आमचे काही ग्राहक नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग ऍप लॉग इन करू शकत नाहीयेत. आमचे तज्ज्ञ हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी काम करत आहेत आणि तुम्हाला लवकरच सेवा पूर्ववत करून देण्यात येईल.’

यापूर्वी एकदा एचडीएफसीने त्यांचे नवीन मोबाईल ऍप लाँच केले होते, तेव्हाही ग्राहकांना याच प्रकारे समस्या आल्या होत्या. नवा मोबाइल ऍप लाँच केल्यानंतर बँकेने जुना ऍप गुगल प्ले स्टोरवरून हटवला होता, यामुळे ग्राहकांना समस्या आल्या होत्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा