पुणे : शहरातील सिंहगड रस्ता परिसरात माणिकबाग येथे एक तरुणी मृतावस्थेत आढळुन आली आहे. ही घटना काल दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. तेजसा श्यामराव पायाळ (वय २६) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजसा मूळची बीड येथील असून तिचे एमबीए पर्यंत शिक्षण झाले आहे. मागील काही महिन्यापासून नोकरीच्या शोधासाठी ती माणिकबागेत भाडोत्री फ्लॅटमध्ये आई व दोन बहिणींसह राहत होती. आठवड्यापूर्वी तेजसासह आई आणि दोन्ही बहिणी बीडला गेल्या होत्या. मात्र, काही कामानिमित्त तेजसा तीन दिवसांपूर्वी एकटीच पुण्यात परतली होती. काल सकाळी तिचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला. याप्रकरणी सिंहगड पोलीस अधिक तपास करीत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा