बेंगळुरू : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सरकार स्थापन केले होते. अवघ्या तीन दिवसांत हे सरकार कोसळल्यानंतर फडणवीस यांना ‘तीन दिवसांचे मुख्यमंत्री’ म्हणत विरोधकांनी टीका केली. त्यातच कर्नाटकमधील भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी ‘केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये परत करण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते,’ असा दावा केला आहे.

काय म्हणाले हेगडे,

महाराष्ट्रात आमचा माणूस फक्त ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाला होता, हे सर्वांनाच माहीत आहे. नंतर त्यांनी राजीनामाही दिला. हे सगळं नाटक त्यांनी का केलं? आपल्याकडं बहुमत नाही हे आम्हाला माहीत होतं. तरीही फडणवीस मुख्यमंत्री का झाले, असा प्रश्न सगळे करत आहेत. तर त्याचं उत्तर आहे, ४० हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हातात त्यावेळी केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये होते. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचं सरकार तिथं आल्यास त्या पैशांचा दुरुपयोग केला जाईल. विकासासाठी ती रक्कम वापरली जाणार नाही, हे त्यांना माहीत होतं. त्यासाठीच हे सगळं नाट्य घडवून आणलं गेलं. हा प्लॅन खूप आधीच ठरला होता. त्यानुसारच फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अवघ्या १५ तासांत केंद्राचे ४० हजार कोटी परत केले गेले.’

वाचा : फडणवीस म्हणतात हेगडेंचा दावा तथ्यहीन

आपल्या बेताल वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असणाऱ्या हेगडे यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. फडणवीसांनी मात्र हेगडे यांचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

हेगडे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

अधिक वाचा : तुम्ही महाराष्ट्राशी गद्दारी केली – राऊत

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा