हैदराबाद : सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या तपासाला जसजशी गती येत आहे तसतशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका २६ वर्षीय डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिचा मृतदेह जाळून पसार झालेले नराधम घटनास्थळी परत आले होते. मृतदेह पूर्णपणे जळाला आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी चौघांनीही पुन्हा त्या ठिकाणी येण्याची हिंमत केली होती. इतकेच नव्हे तर मद्यधुंद अवस्थेतील या चौघांनी पीडितेलाही मद्य पाजण्याचा प्रयत्न केला होता.

सोनई हत्याकांड: पाचजणांची फाशी कायम

तपासात ही बाब समोर आली की दोन आरोपी, शिवा आणि नवीन यांनी आधी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर शमशाबाद आणि शादनगरच्या दरम्यान आधी संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. नंतर चट्टनपल्ली गावातील एका अंडरपासच्या खाली त्यांनी मृतदेह जाळला. हे दोघे पीडितेच्याच बाइकने पुढे जात होते तर बाकीचे दोन आरोपी मृतदेहासोबत ट्रकमध्ये होते. शिवा आणि नवीनने आधी दुसऱ्या दोन-तीन जागादेखील शोधल्या होत्या, पण तिथे लोक होते त्यामुळे हे तिथे थांबले नाहीत.

संसद अधिवेशनात जया बच्चन संतापल्या

महामार्गावर जेव्हा हा खाली येणारा रस्ता दिसला, तेव्हा ती जागा निर्जन असल्याचे ताडून चौघांनी मृतदेह जाळला. यानंतर ते तिथून पसार झाले आणि मृतदेह पूर्णपणे जळला की नाही याची खातरजमा करण्यासाठी काही वेळाने पुन्हा त्या ठिकाणी आले. पोलीस महासंचालक एम. महेंद्र रेड्डी आणि सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी.सज्जनार यांनी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत रविवारी घटनास्थळाची पाहणी केली.

हैदराबाद बलात्कार प्रकरण : सुनावणी ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात

मिळालेल्या माहितीनुसार,डॉक्टरचा हरवलेला मोबाइल फोन ट्रेस केला.मात्र, पोलिसांना त्याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यांच्या मते,फोन हस्तगत करण्यात आला असून फोनची तपासणी सुरू आहे. यापूर्वी अशीही माहिती उजेडात आली की, आरोपींनी महिला डॉक्टरला जबरदस्ती मद्य पाजण्याचादेखील प्रयत्न केला होता,पण पीडितेने त्यांना नकार देत त्यांचा प्रतिकार केला होता.

हैदराबाद घटनेचा तीव्र निषेध

आरोपींनी पीडितेची मदत करण्याच्या बहाण्याने तिला गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला.ते तिची बाइक घेऊन गॅरेजमध्ये गेले होते. तिथल्या मेकॅनिकने दिलेल्या माहितीमुळे पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी झाले. मेकॅनिकच्या माहितीनंतर पेट्रोल पंप आणि जिथे ट्रक पार्क केला त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींचा ठावठिकाणा शोधला. ट्रक मालकाने सांगितले की, ट्रक त्यावेळी मोहम्मद आरिफजवळ होता. त्याच्यामार्फत शिवा, नवीन आणि केशवुलुला अटक केले.

हैदराबाद : देशभरात संतापाची लाट

हैदराबाद : जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह ; बलात्काराची शंका

तेलंगण गृहमंत्र्याचे अजब वक्तव्य

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा