नवी दिल्ली : हैदराबादमध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर झालेला सामूहिक बलात्कार,हत्येप्रकरणी आज संसदेच्या अधिवेशनात देखील वातावरण चांगलेच तापले. आरोपींनी केलेला घृणास्पद प्रकार यामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला.दोन्ही सभागृहातील नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी तर ‘त्या बलात्कारींना झुंडीच्या हवाली करा, त्यांचा झुंडबळी जाऊदे.’ असा सल्ला दिला आहे!

हैदराबाद बलात्कार प्रकरण : सुनावणी ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयात

दोषींना फाशी देण्यासाठी कायदा आणखी कडक करायला हवा,असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत व्यक्त केले. सर्व सदस्यांचे म्हणणे मांडून झाल्यावर लोकसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले, ‘अशा प्रकारच्या अमानुष घटना कायद्याद्वारे नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीद्वारे निकाली काढल्या जाऊ शकतात. बलात्कारासारख्या पाशवी कृत्यांना आळा घालण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीद्वारेच काहीतरी ठोस उपाय केला जाऊ शकतो.आता तर अशा घटनांमध्ये फास्ट ट्रॅक न्यायालयाने निकाल लवकर लागतो,पण आरोपी अपीलांवर अपील करून स्वत:चा बचाव करतात.अशा नराधमांवर दया दाखवायची का? अशा लोकांची दया याचिका केंद्र सरकार, गृहमंत्रालय, राष्ट्रपतींकडे पाठवण्याची व्यवस्था का आहे?’

हैदराबाद : जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह ; बलात्काराची शंका

दोषींना फाशी देण्यासाठी कायदा आणखी कडक करायला हवा, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत व्यक्त केले.

हैदराबाद : देशभरात संतापाची लाट

राज्यसभेतील चर्चेदरम्यान खासदार जया बच्चन यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र शब्दात रोष व्यक्त केला. ‘अशा घटनांमधील आरोपींना झुंडीच्या हवाली करायला हवे आणि त्यांचा झुंडबळी जायला हवा.’ जया यांच्या या सल्ल्यानंतर अध्यक्ष व्यंकय्या नायडूदेखील अवाक् झाले. विशेषत: ‘झुंडबळी’ हा शब्द त्यांना रुचला नाही.

तेलंगण गृहमंत्र्याचे अजब वक्तव्य

काय म्हणाल्या जया बच्चन
जया बच्चन हैदराबादमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने उद्विग्न झाल्या होत्या. त्या म्हणाल्या,’आपण किती वेळ केवळ चर्चा करत बसणार? हैदराबाद झाले, निर्भया झाले, कठुआ झाले. मला वाटते आता सरकारला जाब विचारायला हवा. या सर्व घटनांमधील मुलींना आतापर्यंत किती न्याय मिळाला हे सरकारने सांगायला हवंय.’

हैदराबाद घटनेचा तीव्र निषेध

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा