राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटलांचा हरिभाऊ बागडे यांना टोला

मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर डाव्याबाजूनं ऐकायला येत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष असलेल्या हरिभाऊ बागडे यांना टोला लगावला. तसेच या खुर्चीवर बसणार्‍या व्यक्तीला सर्व समान दिसलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाना पटोले यांची ठाकरे सरकारमध्ये विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर पाटील बोलत होते.

भाजपने ही निवडणूक बिनविरोध केली यासाठी त्यांचे आभार मानताना जयंत पाटील म्हणाले, परवा विरोधी पक्षाचं जेवढ नुकसान झालं ते काल त्यांनी भरुन काढलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. बागडे साहेबांनी आम्हाला पाच वर्षे कायम प्रेमाने वागणूक दिली. मात्र, या खुर्चीचा एक गुण आहे की एकदा त्या खुर्चीवर बसलं की डाव्या बाजूनं ऐकायला येत नाही. पण अध्यक्षांनी डाव्या बाजूला जास्त लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. सभागृहात २८८ सदस्य असतात त्या प्रत्येकाला बोलायच असतं, त्यांना आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची संधी मिळायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा