हैदराबाद : नुकत्याच तेलंगण राज्यात झालेल्या बलात्कार व हत्या प्रकरणी टीकेचे धनी झालेले मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज आपले मौन सोडले. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात होणार असून फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिले.या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हैदराबाद घटनेचा तीव्र निषेध

या प्रकरणाचा तपास त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आले. लवकर तपास पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ती तरुणी ही सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टर होती. तिच्यावर बलात्कारानंतर हत्या करून तिला जाळल्याची घटना समोर आली होती. तिचा मृतदेह गुरुवारी एका पुलाखाली आढळला.ही घटना उघडकीस आल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी तीव्र आंदोलने होत आहेत.

हैदराबाद : देशभरात संतापाची लाट

हैदराबाद : जळालेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह ; बलात्काराची शंका

संसद अधिवेशनात जया बच्चन संतापल्या

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा