मुंबई : भाजपचे कर्नाटकातील खासदार अनंतकुमार हेगडे यांनी ‘केंद्र सरकारचे ४० हजार कोटी रुपये परत करण्यासाठी बहुमत नसतानाही फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले होते,’ असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांच्या वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. फडणवीस यांनी मात्र हेगडेंचा दावा तथ्यहीन असल्याचे सांगत असा कोणताही निर्णय न घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

वाचा : काय म्हणाले होते हेगडे

यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी, ‘हेगडे काय म्हणाले मला माहीत नाही. मला माध्यमांमधुनच ही माहिती मिळाली. मात्र, त्यात काहीही तथ्य नाही. पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मी शेतकऱ्यांच्या मदतीच्या निर्णयाव्यतिरिक्त कोणताही निर्णय घेतलेला नाही. मुळात बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडून कुठलाही निधी मिळालेला नाही. त्यासाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत एक कंपनी सुरू करण्यात आली असून प्रकल्पासाठी निधी आलाच तर तो थेट संबंधित कंपनीकडे जाणार आहे. महाराष्ट्र सरकारकडे तो निधी येणार नाही. राज्य सरकारकडे केवळ भूसंपादनाची जबाबदारी आहे. त्यामुळं व्हॉट्सॲपवर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. राज्याचा एकही पैसा केंद्र सरकारला दिलेला नाही,’ असे स्पष्टीकरण दिले.

शिवसेनेकडून फडणवीस लक्ष्य
हेगडेंच्या वक्तव्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. ही महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचेही राऊत म्हणाले.

वाचा : फडणवीसांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली – राऊत

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा