पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘माध्यम आणि संज्ञापन अभ्यास’ विभागातील धम्मरत्न जावळे यांची युनेस्कोच्या गॅपमिल या कार्यक्रमासाठी जागतिक युवादूत म्हणून आशिया-पॅसिफिक प्रदेशासाठी नियुक्ती झाली. युनेस्कोच्या नेतृत्वातील ‘ग्लोबल अलायन्स फॉर पार्टनरशिप ऑन मीडिया अ‍ॅन्ड इन्फॉरमेशन लिटरसी’ (GAPMIL) कडून जगातील विविध भागांत युनेस्कोच्या माध्यम आणि माहिती साक्षरतेसाठीच्या जागतिक कृती आराखड्यावर काम करण्यासाठी जगभरातून बारा युवादूतांची नावे जाहीर केली. जगभरातून आलेल्या सहाशेपेक्षा अधिक अर्ज आणि प्रस्तावांमधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागातील पीएचडीचे विद्यार्थी धम्मरत्न श्रीराम जावळे यांची या १२ युवादूतांमध्ये आशिया-पॅसिफिक प्रदेशासाठी UNESCO-GAPMILचे जागतिक युवादूत म्हणून निवड झाली.

धम्मरत्न जावळे हे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागातील एम.एस्सी.अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत. सदध्या ते विभागप्रमुख डॉ. माधवी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यूजीसीच्या कनिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती (एमएचआरडी, भारत सरकार) अंतर्गत पीएचडी संशोधक म्हणून काम करत आहेत. त्यांची आशिया-पॅसिफिकमधील तीन अन्य युवादूतांसोबत निवड झाली असून त्यांच्यासोबत आफ्रिका, अरब राज्ये, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांतील अन्य युवा दूतांचाही समावेश आहे. सर्व युवादूत GAPMIL च्या जागतिक युवक समितीचे २०१९-२०२१ या कालावधीसाठी सदस्य म्हणून आपापल्या विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

धम्मरत्न श्रीराम जावळे
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा