मुंबई : राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं असतानाच राज्यातील अनेकजजण शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा गौफ्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार का यावर बोलताना, ‘पंकजाच काय अनेकजण शिवसेनेच्या वाटेवर आहेत,’ असं राऊत यांनी सांगितलं.

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी भाजप नेते अनंत कुमार हेगडे यांच्या वक्तव्यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ‘महाराष्ट्राचा ४० हजार कोटींचा विकासनिधी केंद्राकडे परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांसाठी मुख्यमंत्री झाले,’ असे वक्तव्य हेगडे यांनी केले होते. यावर राऊत यांनी, ‘ही महाराष्ट्राशी केलेली गद्दारी आहे,’ अशी टीका केली आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी त्यांची पुढील राजकीय वाटचाल काय असेल याबाबत १२ डिसेंबरला भगवान गडावरुन बोलणार असल्याचे फेसबुक पोस्टवरुन सांगितले आहे. त्यातच त्यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून भाजपचा उल्लेख काढल्याने तर्कांना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे यांचा बदललेला ट्विटर बायो
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा