धुळे : उस्मानाबाद येथे उसतोडीच्या कामासाठी जाणाऱ्या,कामगारांच्या टेम्पोला भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो नदीत कोसळल्यामुळे ७ कामगारांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.धुळे-सोलापूर महामार्गावर बोरी नदीच्या पुलाजवळ शनिवारी मध्यरात्री हा अपघात घडला.

अपघातातील मृत हे मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्याचे रहिवासी असल्याचे समजते. हा अपघात अरुंद पुलाचा अंदाज चालकाला न आल्यामुळे घडल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली.या अपघाताची माहिती मिळताच, स्थानिकांनी जखमींना पाण्यातून बाहेर काढत,जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा