नवी दिल्ली : भाजपच्या गोटात प्रवेश करुन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत अजित पवार यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. परंतु, अवघ्या ७८ तासांत त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे नव्याने स्थापन झालेले फडणवीस सरकार कोसळले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारचा मार्ग मोकळा झाला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या सगळ्या घडामोडींवर प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ‘अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते होते. सरकार स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता. भाजपला पाठिंबा देताना राज्यपालांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली. सुरुवातीला जेव्हा राष्ट्रवादीने सरकार बनवण्यास असमर्थता दर्शवली होती तेव्हा राज्यपालांना दिलेल्या पत्रावर पवार यांचीच सही होती. आमच्या समर्थनासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याच्या पत्रावर देखील त्यांचीच सही होती. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला,’ असं शहा यांनी सांगितलं.

अजित पवारांनी सोडले मौन, म्हणतात

कुठलीही फाइल बंद नाही
अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर सिंचन घोटाळा प्रकरणातील काही केसेस बंद करण्यात आल्या. त्यामुळे, अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा जोरात होती. शहा यांनी या चर्चेचे खंडन केले असून ‘त्यांच्यावर आरोप असलेल्या कुठल्याही प्रकरणाची फाइल बंद करण्यात आलेली नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस म्हणाले
याच घडामोडींबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी, ‘योग्य वेळी योग्य ते बोलेन’ अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.

शिवसेनेचं सूर्ययान दिल्लीतही उतरेल : राऊत

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा