पुणे : शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा होत नसल्यामुळे सत्ताधारी भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात आंदोलन केले. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात गप्प असणाऱ्या सत्ताधारी भाजपने सुध्दा राज्यातील सत्ता गेल्यानंतर आंदोलनात सहभाग घेतला. साडेतीन किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम रखडले असून कामासाठी पोलीस संरक्षण मागितले आहे. यानंतर कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

भामा आसखेडच्या जॅकवेलचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. साडेतीन किलोमीटरच्या पाईपलाईनचे काम आंदोलनामुळे थांबले आहे. पोलीस बंदोबस्तात हे काम लवकरच सुरू करून मार्चअखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक व्ही. जी. कुलकर्णी यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत दिली.

वडगाव शेरी आणि समाविष्ट 11 गावांमध्ये कमी दाबाने आणि अवेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरून सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्षाच्या नगरसेवकानीं सभागृहात प्रशासनाला धारेवर धरले. या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर येत जोरदार आंदोलन केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा