मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कधी सुटतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दोन्ही काँग्रेसच्या बैठकीनंतर गुरुवारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि नेत्यांची बैठक पार पडली. किमान समान कार्यक्रमाबाबत या त्रिपक्षीय नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीनंतर सकारात्मक प्रतिक्रिया देत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्तास्थापनेची कोंडी लवकर सुटण्याचे संकेत दिले.

वडेट्टीवार म्हणाले,
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रमाचा अंतिम मसुदा तयार केला आहे. हा मसुदा तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात येईल. त्यांनी मंजुरी देताच राज्यात महाआघाडीचं सरकार स्थापन होईल.
शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी, अशाच सगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे. लवकरच यातून सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बहुमत असेल तर सरकार स्थापन करा : शहा

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा