सॅनफ्रान्सिस्को : फेसबुकने आपल्या कंपन्या फेसबुक, व्हॉट्सऍप, मेसेंजर आणि इन्स्टाग्रामवर पैसै भरण्यासाठी नवी यंत्रणा फेसबुक पे’ लाँच केली.ही सुविधा अमेरिकेत या आठवड्यापासून सुरू होत आहे.ही यंत्रणा लवकरच भारतातही येणार आहे.

फंडरेजिंग, इन गेम खरेदी कार्यक्रमांची तिकीटे, मेसेंजरवरील पेमेंट आणि फेसबुक मार्केट प्लेसवर पेज आणि व्यापारी खरेदी करणे लोकांनी फेसबुक पे द्वारे सुरूही केले आहे.

फेसबुकचे मार्केटप्लेस आणि कॉमर्स शाखेचे उपाध्यक्ष देबोरा लिउ म्हणाले,”टप्प्याटप्य्याने फेसबुक पे योजना आणखी लोकांपर्यंत, जगभरात पोहोचण्यासाठी इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप वरही सुरू करणार आहे.”

कंपनीने सांगितले की, फेसबुक पे आर्थिक संरचना आणि भागीदारीवर आधारित आहे. कंपनीची डिजीटल करन्सी लिब्रा नेटवर्कवर चालणाऱ्या लिब्रा वॉलेटपेक्षा हे वेगळे आहे.

फेसबुक किंवा मेसेंजरवर काही टप्प्यांची प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही ‘फेसबुक पे’चा वापरू शकता. यासाठी फेसबुक ऍप किंवा वेबसाइटवर आधी सेटिंगमध्ये जाऊन नंतर ‘फेसबुक पे’ वर जाऊन पेमेंट मेथड जोडा.यानंतर तुम्ही पुढील पेमेंट केल्यानंतर फेसबुक पे वापरू शकता. ‘फेसबुक पे’ प्रणालीच्या माध्यमातून अत्यंत सहज आणि अतिशय सुरक्षितपणे व्यवहार करता येईल, असा दावा कंपनीने केला आहे.

यात युजर पीन क्रमांक तसेच फेस आयडी अथवा टच आयडीचे सुरक्षा कवचदेखील लावण्याची सुविधा मिळेल. व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामवर फेसबुक पे सुरू होताच तुम्ही ते प्रत्येक ऍपवर थेट कनेक्ट करू शकाल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा