मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात आता नवा अंक सुरु झाला आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू झाल्याची चर्चा सुरु आहे.

शिवसेना नेत्यांनी सोमवारी संध्याकाळी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तरीही पाठिंब्याचं पत्र न दिल्याने राज्यपालांनी मुदतवाढ देण्यास नकार दिला. त्यामुळे दावा जरी कायम असला तरीही शिवसेनेला दिलेली मुदत संपली आहे. दिलेल्या वेळेपर्यंत बहुमत सिद्ध करु शकलेली नाही त्यामुळे सत्तास्थापनेचा पेच कायम आहे.

काँग्रेसच्या पत्रात दडलंय काय ?

सेना आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ‘दोन्ही काँग्रेससोबत आमचं बोलणं सुरु आहे. आम्ही ४८ तासांची मुदतवाढ मागितली होती परंतु राज्यपालांनी नकार दिला आहे. आमचा सत्तास्थापनेचा दावा कायम आहे. येत्या काही दिवसांत सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना पुन्हा येईन,’ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा