मुंबई : महाराष्ट्रात कोणाची सत्ता स्थापन होणार हे कोडं १८ दिवस उलटले तरी सुटलेले नाही. भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार का विरोधात बसणार? शिवसेना कोणाच्या पाठींब्याने सरकार स्थापन करणार? हे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. रविवारी दिवसभर बैठकांचे सत्र सुरु आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार आणि काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा अशी चर्चा जोरात आहे.

वाचा : ‘मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकच’

यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नाही,’ असं वक्तव्य केलं आहे. पवारांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट न केल्याने सत्तास्थापनेचे चित्र अजूनही धुसरच आहे. मुंबईत पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि शरद पवार यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली.

खर्गे म्हणतात, जनादेश विरोधात बसण्याचा, पण..

मुख्यमंत्रिपदाचा चेंडू अमित शहांच्या कोर्टात

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा