मुंबई : भाजपने सत्तास्थापनेचा दावा करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपने भूमिका जाहीर केल्यानंतर शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

वाचा : सत्ता स्थापनेसाठी भाजपचा नकार, सेनेला शुभेच्छा

भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपला टोला लगावला. ‘काळ संध्याकाळपर्यंत भाजपचे नेतृत्व त्यांचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत होते. मात्र आता त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार? शिवसेनेला केलेल्या अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या वचनाचं पालन करायचं नाही आणि मुख्यमंत्रिपदाचा अट्टहास यामुळे भाजपवर ही वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे,’ अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकच : उद्धव ठाकरे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा