जयपूर : सेना आणि भाजपमधलं वाढतं वितुष्ट बघता राज्यात नवं राजकीय समीकरण उदयाला येण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आमदार फोडले जाण्याच्या शक्यतेने काँग्रेसने आपल्या आमदारांना जयपूर येथे हलवले होते. राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांची व आमदारांची बैठक जयपूरमध्ये नुकतीच पार पडली.

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. काही आमदारांचा अपवाद वगळता सर्व आमदारांनी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्यास होकार दर्शवल्याची माहिती मिळत आहे. भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा न झाल्याचं जाहीर केलं होतं तर शिवसेनेने चर्चा झाली असून मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अविनाश पांडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे यावेळी उपस्थित होते.

वाचा : मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकच : उद्धव ठाकरे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा