जयपूर : राज्यात नवं समीकरण उदयास येणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसचे काही आमदार सकारात्मक असल्याची माहितीही मिळत आहे. काँग्रेस आमदार आणि राज्यातील दिग्गज नेत्यांची बैठक जयपूरमध्ये पार पडली. या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी, ‘महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे. आमचाही तोच निर्णय आहे. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अंतिम असेल,’ असं वक्तव्य केलं आहे.

‘हायकमांडनी निर्णय घेतल्यानंतरच काँग्रेसची अंतिम भूमिका जाहीर होणार आहे. काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं कोणी बोलत आहे, तर पाठिंबा न देता विरोधात बसणार असल्याचं कोणी सांगत आहे. मात्र मी हे स्पष्ट करू इच्छितो की, जनादेशाचा आदर करत काँग्रेस व राष्ट्रवादी विरोधात बसून काम करणार आहे,’ असं खर्गे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता सत्तास्थापनेचा तिढा सुटणार का आणखी वाढणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आपला निर्णय जाहीर होणार आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकच : उद्धव ठाकरे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा