मुंबई : राज्याच्या सत्तास्थापना नाट्यात आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रवेश झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. या बैठकीत भाजप विरोधात बसणार का पुन्हा सेनेला सोबत घेणार यावर निर्णय होणार आहे. भाजपचे राज्यातील दिग्गज नेते व महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव या बैठकीला उपस्थित असून अमित शहा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि भाजपचे इतर नेते उपस्थित आहेत. या बैठकीनंतर शिवसेनेला अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद द्यायचे की नाही? शिवसेनेशी युती करायची की नाही? सत्तास्थापनेचा दावा करावा का विरोधात बसायचे? या प्रश्नांची उकल होणार आहे. त्यामुळे अमित शहा काय निर्णय घेतात यावर राज्यातली समीकरणे अवलंबून आहेत.

वाचा : ‘मुख्यमंत्रिपदाच्या पालखीत शिवसैनिकच’

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आपल्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले आहे तर काँग्रेसनेही सेनेला पाठिंबा देण्याबाबत बैठक घेतली आहे.

खर्गे म्हणतात, जनादेश विरोधात बसण्याचा, पण..

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा