नवी दिल्ली: देशात तब्बल १०६ वर्षे सुरू असलेल्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला असून वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला.सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे आता वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते. मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.

अशी होईल मंदिर उभारणी
सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागी राम मंदिर उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात यावी असे आदेश निकाल वाचना दरम्यान दिली. मंदिर उभारणी संदर्भात ट्रस्ट निर्माण करून मंदिर निर्मितीबाबत नियम तयार करावेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

सुन्नी वक्फ बोर्डाकडून निर्णयाचे स्वागत
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा सुन्नी वक्फ बोर्डाने स्वागत केले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितले की,२००९ मध्ये वादग्रस्त जमीन तीन भागांमध्ये वाटण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय तार्किकदृष्ट्या चुकीचा होता. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा ५-०, अर्थात सर्वसमंतीने दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे विविध संस्था आणि संघटनांनी स्वागत केले आहे. हिंदू महासभेचे वकील वरुण कुमार सिन्हा यांनीही हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे म्हटले. या निर्णया बरोबरच सर्वोच्च न्यायालयाने विविधतेत एकता हाच संदेश दिला असल्याचे सिन्हा म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिल्यानंतर वकिलांच्या एका समूहाने सर्वोच्च न्यायालय परिसरात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. मात्र, अशा घोषणा देणे योग्य ठरणार नसल्याचे इतर काही वकिलांनी सांगितल्यानंतर या घोषणा थांबवल्या.

अपडेट्स

सुन्नी वक्फ बोर्डाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत

मुस्लिमांना पर्यायी पाच एकर जागा देणार

अयोध्येतील वादग्रस्त जागा हिंदुंची; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वापूर्ण निकाल

१८५६-५७ पूर्वी नमाजपठणाचे पुरावे नाहीत – न्यायालयाचं निरीक्षण

१८५६ पूर्वी वादग्रस्त जागेवर हिंदूंकडून चौथऱ्यावर पुजा – सर्वोच्च न्यायालय

मशिदीचं निर्माण मंदिर उद्धवस्त करून करण्यात आलं हे पुरातत्व विभागाला स्थापित करता आलं नाही – सर्वोच्च न्यायालय

हिंदुंची श्रद्धा आणि विश्वास की भगवान रामाचा जन्म अयोध्येत झाला, हे निर्विवाद आहे: सर्वोच्च न्यायालय

मशीद रिकाम्या जागी बांधली होती. पण मशिदीखालचा संरचना इस्लामिक नव्हती: कोर्ट

रामलल्लाला कोर्टानं पक्षकार मानलं

पुरातत्व विभागाचे दावे कोर्टाने धरले ग्राह्य

निर्मोही आखाड्याचा दावा कोर्टाने फेटाळला

एकाची श्रद्धा दुसऱ्याचा हक्क हिरावू शकत नाही : कोर्ट

शिया वक्फ बोर्डाचा दावा एकमताने फेटाळला. गोगोई म्हणाले, ‘आम्ही १९४६ च्या फैजाबाद कोर्टाच्या निकालाला आव्हान देणारी शिया वक्फ बोर्डाची सिंगल लीव पिटीशन फेटाळत आहोत’

अयोध्येत ३० बॉम्ब निकामी पथके तैनात

जाणून घ्या अयोध्या वादाचा घटनाक्रम

ऐतिहासिक निर्णय देणारे हे घटनापीठ

अयोध्येमध्ये राम मंदिर आणि…

अयोध्या निकाल : सर्व स्तरातून निर्णयाचे स्वागत

आव्हान देणार : मुस्लीम पक्षकार

अयोध्या-बाबरी मशीद वाद : १२६ वर्षे जुना खटला

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा