कर्तारपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या चेक पोस्टचे उद्घाटन केले. यावेळी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी कर्तारपूर प्रकल्पा संदर्भात वेगाने काम करणाऱ्या पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानचे इम्रान खान यांचे अभार मानले. यावेळी त्यांनी शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव य़ांची शिकवण केवळ शीख समुदायालाच नाही तर सर्व भारतीयांना प्रेरणा देणारी आहे असे मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

कर्तारपूर कॉरिडोअरच्या भारतातील चेक पोस्टचे उद्घाटन केल्यानंतर मोदींनी शीख समुदायाशी संवाद साधला. यावेळी मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात पाकिस्तानचे आभार मानत केली. “मी पाकिस्तान सरकारचे तसेच पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानतो. भारतीयांच्या भावना समजून त्यांनी या प्रकल्पाचे त्वरित काम केले. इतकचं नाही मी या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांचेही अभिनंदन करु इच्छितो,” असं म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तसेच या चेक पोस्टच्या माध्यमातून हजारो श्रद्धाळूंची सेवा केली जाईल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

शीख समुदायाच्या शिकवणीचा आज वेगवेगळ्या माध्यमातून जगभरामध्ये प्रसार केला जात आहे. शीख समुदायसाठी महत्वाची धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी आठवड्यातून एकदा विशेष ट्रेन धावणार असल्याची माहिती देखील मोदींनी आपल्या भाधनात दिली.

गुरुनानक यांनी कर्तापूर येथे पहिले गुरुद्वारा १५२२ मध्ये स्थापन केले तसेच इथेच त्यांनी अखेरचा श्वासही घेतला. त्यामुळे शीख समुदायासाठी हे ठिकाण अत्यंत महत्वाचे आहे. सध्या हे स्थान भारतीय सीमेपासून ४ किमी लांब पाकिस्तानात स्थित आहे. कर्तारपूर गुरुद्वार दरबार साहिबपर्यंत भारतीयांना दर्शनासाठी जाता यावे यासाठी भारतातील भाविकांना व्हिसाशिवाय पाकिस्तानात जाता येणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा