सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालानंतर राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. याच निकालानंतर शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. मात्र बरेच दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षामध्ये शिवसेनेची भूमिका मांडणाऱ्या राऊत यांनी या ट्विटमधूनही भाजपची फिरकी घेतली आहे.

‘अयोध्येमध्ये राम मंदिर आणि महाराष्ट्रात सरकार… जय श्रीराम!’ असे ट्विट राऊत यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी ‘पहिल्यांदा मंदिर मग सरकार’ असे ही या ट्विटमध्ये म्हटले आहे. अयोध्या प्रकरणाचा निकाल लागला आता राज्यातील महाराष्ट्रात सरकार कोण स्थापन करणार याचाही निकाल लागेल असे सूचक संकेत त्यांनी या ट्विटमध्ये दिला.

राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेनेने मागील वर्षभर आक्रमक भूमिका घेतली होती. राम मंदिर प्रश्ना संदर्भात शिवसेनेने वर्षभऱामध्ये बरेच कार्यक्रम घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे काही प्रमुख नेते याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये अयोध्येला गेले होते. शरयु नदीच्या किनारी त्यांनी महाआरतीही केली होती. याच दौऱ्याची जाहिरातबाजी करण्यासाठी पक्षाने राज्यामध्ये ‘पहले मंदिर फिर सरकार’ असे बॅनर्स लावले होते.

लोकसभा निवडणुकीच्या काही महिनेआधीच शिवसेनेने राम मंदिर बांधण्यासंदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता.

काय होते नेमके ट्विट

पहले मंदिर फिर सरकार!!!
अयोध्या में मंदिर
महाराष्ट्र मे सरकार…
जय श्रीराम!!!

शुक्रवारीच शिवसेनेकडून राम मंदिराचा निर्णय काहीही लागला तरी ते सरकारचे यश आहे असे समजू नये असे जाहीर केले होते. याच पद्धतीची प्रतिक्रिया राऊत यांनी निकाल लागल्यानंतर दिली. “राम मंदिरासाठी झालेले आंदोलन हे कोण्या एका पक्षाचे नव्हते, यामध्ये सर्वपक्षाचे लोक होते. राम मंदिराचा अध्यादेश आणावा अशी मागणी आम्ही (शिवसेनेने) केली होती.मात्र त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघा असं सांगितलं होतं. आज अखेर या खटल्याचा निर्णय लागला.

न्यायलयाने आज दिलेला निर्णय सगळ्यांनी मान्य करायला हवा. हा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा आहे सरकारचा नाही,” असा टोलाही राऊतांनी भाजप सरकारला लगावला.

अयोध्या प्रकरणी : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

अयोध्या-बाबरी मशीद वाद : १२६ वर्षे जुना खटला

आव्हान देणार : मुस्लीम पक्षकार

अयोध्या निकाल : सर्व स्तरातून निर्णयाचे स्वागत

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा