वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वादाला आता पूर्वविराम मिळाला असून ती जागा ही हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. वादग्रस्त जागा हिंदुंना देण्यात येईल. तर मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळी जमीन देण्यात येईल. केंद्र सरकारने तीन महिन्यांत योजना तयार करेल. राम मंदिर बांधण्यासाठी सरकार ट्रस्ट तयार करेल. तर अयोध्येत महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बनवण्यासाठी जागा दिली जाईल,असे न्यायालयाने म्हटले . या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘जय श्री राम’ अशी प्रतिक्रिया दिली.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील वडाळा येथील राम मंदिरातीला आरतीसाठी उपस्थित राहणार आहेत.

मंदिर तिथेच बनेल आणि भव्य बनेल. शांती आणि सौहार्द राखा. कोट्यवधी हिंदूंच्या त्याग आणि बलिदानाचे फळ मिळाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : डॉ. प्रवीण तोगडीया

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वधर्मसमभावाची भावना आणखी दृढ होईल. हा निर्णय सर्वांनी उदारतेने स्वीकारावा. सर्वांनी शांतता राखावी
: राजनाथ सिंह,केंद्रीय संरक्षण मंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने स्वागत करत एक फोटो ट्विट केला.सेहवागने श्रीरामाचा फोटो ट्विट केला. त्यासोबत ‘श्री राम जय राम जय जय राम’ असे ट्विट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी,”सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल असेल तो आम्हाला मान्य असेल आणि सर्वांनी मान्य करावा अशी आमची सुरुवातीपासूनच भूमिका राहिली आहे. देशात धर्माच्या नावावरून आणखी कोणता नवीन वाद निर्माण होणार नाही अशी आशा आहे.’ आमची सुरुवातीपासून भूमिका होती की, जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. त्यामध्ये राजकीय पक्ष असतील, धार्मिक संघटना असतील, यांनी मान्य केला पाहिजे असे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले.

याशिवाय मलिक ट्विटमध्ये म्हणाले, ”या अगोदर लोकांनी मान्य केले आहे. त्यामुळे लोकांनी याचं श्रेय घेऊ नये, कुठेही उत्सव साजरा करु नये. कुणाच्या भावना दुखावल्या जावू नये ही भावना लोकांनी स्वीकारली पाहिजे असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी स्वागत केले.या निकालाचा सर्व वर्गातील लोकांनी आदर बाळगावा आणि देशात शांतता आणि बंधुभाव वाढेल याची काळजी घ्यावी, असे पवार यांनी म्हटले.

अयोध्या प्रकरणी : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

अयोध्या-बाबरी मशीद वाद : १२६ वर्षे जुना खटला

आव्हान देणार : मुस्लीम पक्षकार

ऐतिहासिक निर्णय देणारे हे घटनापीठ

अयोध्येमध्ये राम मंदिर आणि…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा