नवी दिल्ली: राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादग्रस्त जमीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्ही सन्मान करतो, मात्र हा निकाल समाधानकार नसल्याचे मुस्लीम पक्षकारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या संदर्भात नक्की काय करायचे याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतरच आम्ही पुढील पाऊल उचलू असेही या पक्षकारांनी स्पष्ट केले. मशीद बांधली गेली हे मान्य केले गेले. मात्र, १९५७ पूर्वी नमाज पढला गेला नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. तिथे नमाजही करत नाही, आणि कुणी पूजाही करत नव्हते. मात्र, वादग्रस्त जागेच मशीद अस्तित्वात होती असे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. मग जर तिथे मशीद असेल तर नमाजही पढला गेला असणारच. यामुळे जिथे एका धर्माचे लोक प्रार्थना करतात, ती जागा दुसऱ्या धर्माच्या लोकांना देणे, हा प्रकार आम्हाला समजला नसल्याचे जफरयाब जिलानी म्हणाले.

अयोध्या प्रकरणी : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

वकिलांची टीम सल्ला मसलतीनंतर यावर काय करायचे याचा निर्णय घेतला नाही. या संदर्भात मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाशी चर्चा करणार असल्याचे ही ते म्हणाले. ही जमीन एकाच पक्षाला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्ही निराश आहोत. यामुळे चर्चेनंतर आम्ही या निर्णयाला आव्हान देणार असल्याचेही जिलानी म्हणाले. या अगोदर आपण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पूर्ण अभ्यास करूनच पुढील पाऊल उचलू असेही ते म्हणाले.

अयोध्या-बाबरी मशीद वाद : १२६ वर्षे जुना खटला

अयोध्या निकाल : सर्व स्तरातून निर्णयाचे स्वागत

ऐतिहासिक निर्णय देणारे हे घटनापीठ

अयोध्येमध्ये राम मंदिर आणि…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा