सर न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच जणांच्या घटनापीठाने अयोध्येचा निकाल दिला. या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. या न्यायाधीशांविषयी जाणून घेऊ या…

न्यायमूर्ती रंजन केशव चंद्र गोगोई

न्यायमूर्ती रंजन केशव चंद्र गोगोई
जन्म : १८ नोव्हेंबर १९५४

रंजन गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी सर न्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. १९७८ मध्ये बार कौन्सिलमध्ये दाखल झाले. गुवाहाटी उच्च न्यायालयातून वकिलीला सुरुवात केली आणि २००१ मध्ये ते गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीशही झाले. २०१० मध्ये त्यांची पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २०११ मध्ये ते पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. २३ एप्रिल २०१२ रोजी न्यायमूर्ती रंजन गोगोई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश असताना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अयोध्या प्रकरण, एनआरसी, जम्मू-काश्मीरवरील अर्जांसह अनेक ऐतिहासिक खटल्यांची सुनावणी केली. त्यांचे वडील केशब चंद्र गोगोई १९८२ मध्ये आसामचे मुख्यमंत्री होते. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होणारे ते पहिलेच ईशान्य भारतीय आणि आसामी व्यक्ती आहेत.

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे
जन्म : २४ एप्रिल १९५६

शरद बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे १९८० ते १९८५ या काळात महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते. सेंट फ्रान्सिस डिसेल्स महाविद्यालयातून बी.ए. केल्यानंतर नागपूर विद्यापीठातून एल.एल.बी.ची पदवी पूर्ण केली. बोबडे १९७८ मध्ये महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये रुजू झाले आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली सुरू केली.२००० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. ऑक्टोबर २०१२ मध्ये मध्य प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले बोबडे २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. शरद बोबडे अयोध्यामधील रामजन्मभूमी वाद, आधारची अनिवार्यता यासह बऱ्याच महत्त्वाच्या खटल्यांच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात खंडपीठाचे सदस्य होते. ते २३ एप्रिल रोजी २०२१ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत.

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड
जन्म : ११ नोव्हेंबर १९५९

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी १३ मे २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत विष्णू चंद्रचूड सर्वाधिक काळ म्हणजे १९७८ ते १९८५ या काळात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्याचबरोबर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणूनही काम पाहिले आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी जगातील अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांत व्याख्यान दिले आहे. न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यापूर्वी ते देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते. सबरीमाला, भीमा कोरेगाव, समलैंगिकता यासह अनेक बड्या खटल्यांमध्ये ते खंडपीठाचे सदस्य राहिले आहेत.

न्यायमूर्ती अशोक भूषण

न्यायमूर्ती अशोक भूषण
जन्म : ५ जुलै १९५६

अशोक भूषण यांनी १९७९ मध्ये वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि उत्तर प्रदेश बार कौन्सिलचे सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिली केली. या व्यतिरिक्त त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अनेक पदांवर काम केले आणि २००१ मध्ये न्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झाली. २०१४ मध्ये त्यांची केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि २०१५ मध्ये ते सरन्यायाधीश झाले. १३ मे २०१६ रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारला. अशोक भूषण यांनी अनेक शैक्षिणक संस्था, सहकारी संस्था आणि बँकांमध्ये कायदेविषयक सल्लागार म्हणून कार्य केले. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने क्रिकेटपटू एस श्रीसंत याच्यावरील आजीवन बंदी उठवण्याचा निर्णय मार्च २०१९ मध्ये घेतला.

न्यायमूर्ती अब्दुल नजीर

न्यायमूर्ती अब्दुल नजीर
जन्म : ५ जानेवारी १९५९

कर्नाटकात जन्मलेले न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांनी मंगळुरूच्या एसडीएम लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळविली.अयोध्या प्रकरणाच्या खंडपीठावर असलेले न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांनी १९८३ मध्ये वकिली सुरू केली. कर्नाटक उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी अतिरिक्त न्यायाधीश आणि पूर्णवेळ न्यायाधीश म्हणून काम केले.१७ फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
फेब्रुवारी २०१९ मध्ये पॅन कार्डला आधार जोडणे गरजेचे असल्याचा महत्त्वाचा निर्णय नजीर यांच्या खंडपीठाने दिला होता. रामजन्मभूमी-बाबरी मशीद सुनावणीतून उमेश लळीत यांनी माघार घेतल्याने त्यांच्या जागी अब्दुल नाजीर यांची नियुक्ती करण्यात आली.

अयोध्या प्रकरणी : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

अयोध्या-बाबरी मशीद वाद : १२६ वर्षे जुना खटला

आव्हान देणार : मुस्लीम पक्षकार

अयोध्या निकाल : सर्व स्तरातून निर्णयाचे स्वागत

अयोध्येमध्ये राम मंदिर आणि…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा