राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. न्यायालयाने केंद्र सरकारला निकालपत्रात दिल्यानुसार कार्यवाहीचे आदेश दिले.अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्यात यावे, तर मशिदीसाठी मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल,असा निर्णय घटनापीठाने एकमताने दिला.

आता राजकारणातील ‘रामनामा’चा जप थांबेल : काँग्रेस

या घटनेतील वादाची मुद्द्यांना पूर्ण विराम मिळाला असला तरी या या खटल्याचे अनेक कंगोरे आहेत. या खटल्याचा कालवधी बघता बऱ्याच जेष्ठांची यामागे भावना, कार्य जोडलेले आहे. खटल्याशी संबंधित वकील, पक्षकार, उत्खनन करणारे यांची महत्वाची भूमिका आहे.
काही दशके चाललेल्या या खटल्यात वरिष्ठ वकील के.पारासरन यांचाही मोलाचा वाटा आहे. ९२ वर्षांच्या पारासरन यांनी या खटल्यात हिंदू पक्षाची बाजू मांडली. विशेष म्हणजे गेली चाळीस वर्षांपासून ते या खटल्यामध्ये हिंदूंची बाजू मांडत होते.

ऐतिहासिक निर्णय देणारे हे घटनापीठ

या ऐतिहासिक निकालानंतर त्यांनी देखील आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.माजी अटॉर्नी जनरल असलेल्या पारासरन यांना मदत करण्यासाठी काही तरुण वकील त्यांच्या टीममध्ये काम करतात. ते म्हणाले, ‘मला नेहमीच भगवान रामाबद्दल अध्यात्मिक ओढ होती. त्यामुळेच मी हा खटला लढवण्याचे ठरवले,’

अयोध्येमध्ये राम मंदिर आणि…

”आपली बाजू मांडण्यापूर्वी त्यांनी या प्रकरणाचा सखोल अभ्यास केला. ते रोज सकाळी साडे दहापासून या प्रकरणाचा अभ्यास करायचे. त्यांचे या संदर्भातील वाचन आणि काम हे सकाळी साडेदहापासून संध्याकाळी उशीरापर्यंत सुरू असायचे.

अयोध्या निकाल : सर्व स्तरातून निर्णयाचे स्वागत

पारासरन यांच्या टीममध्ये पी व्ही योगेश्वरन, अनिरुद्ध शर्मा, श्रीधर पोट्टाराजू, अदिती दानी, अश्विन कुमार डीएस आणि भक्ती वर्धन सिंह ही तरुण वकील मंडळींनी पारासरन यांच्यासोबत या खटल्याचे काम केले. ९२ व्या वर्षाच्या पारासरन यांची जिद्द, चिकाटी पाहून या तरुणांनाही उत्साह संचारायाचा.

अयोध्या-बाबरी मशीद वाद : १२६ वर्षे जुना खटला

पारासरन यांचा अयोध्या खटल्याचा इतका अभ्यास होता की ते बऱ्याचदा न्यायालयासमोर खटल्यातील महत्वाच्या तारखा बोलता बोलता सांगायचे असे त्यांच्या टीमधील सदस्य सांगतात. कोणत्या दिवशी काय घडले होते, हे पारासरन मुखोद्गत होते. ‘पारासरन यांनी अयोध्येवर एवढे संशोधन आणि वाचन केले आहे की त्यांच्यावरच एक पुस्तक लिहिता येईल,’ असे या टीमचे सदस्य सांगतात.

अयोध्या प्रकरणी : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

अयोध्या सुनावणी दरम्यान पारासरन आणि मुस्लीम पक्षाची बाजू मांडणाऱ्या राजीव धवन यांचा युक्तीवाद झाला होता. धवन हे त्याच्या अभेद्य युक्तीवादासाठी ओळखले जातात. मात्र पारासरन मागील ४० वर्षांपासून या खटल्यावर काम करत राहिले. एकदाही त्यांनी हार मानली नाही. मागील महिन्यामध्ये राजीव धवन यांनी न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयामध्येच हिंदू पक्षाची बाजू मांडणाऱ्या वक्तव्यांची कागदपत्रे फाडली तेव्हा सुद्धा पारासरन शांत होते.

आव्हान देणार : मुस्लीम पक्षकार

१६ ऑक्टोबरला झालेल्या या घटनेनंतर पारासरन यांनी धवन यांची भेट घेतली. दोघांनाही काही काळ एकमेकांबरोबर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी एकत्र फोटोही काढला. यामधून पारासरन यांना एकच संदेश द्यायचा होता. न्यायालयामध्ये एकमेकांविरोधात लढणारे वकील हे एकमेकांविरोधात नसून ही मुद्द्यांची लढाई हेच पारासरन आणि धवन यांना आपल्या कृतीतून दाखवून दिले.

ऐतिहासिक निकालानंतर ज्येष्ठ वकील के. पारासरन त्यांच्या टीमसमवेत
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा