मुंबई : देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये घट झाली. देशात २०१० मध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये घट नोंदवली होती, ज्यानंतर या घटना कमी होत गेल्या. मात्र २०१५ मध्ये पुन्हा एकदा आत्महत्या वाढल्याने चिंताही वाढली होती. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) शुक्रवारी २०१६ या वर्षातील आकडेवारी प्रसिद्ध केली.

ही आकडेवारी जाहीर करताना नेमक्या कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली गेली, त्याची कारणेही दिली आहेत. महिला आणि पुरुषांमध्ये आत्महत्येची कारणं वेगवेगळी आहेत.आत्महत्येची दोन सर्वात मोठी कारणं आजारपण आणि कौटुंबिक समस्या आहेत. महिलांमध्ये आत्महत्येचे सर्वात जास्त कारण हे लग्न, प्रेम आणि परीक्षेत अपयश ही असल्याचे समोर आले. तर पुरुषांमध्ये व्यसनाधिनता, दिवाळखोरी आणि लग्नाची समस्या ही कारणे आहेत.

२०१६ मध्ये वैवाहिक समस्या, आजारपण, संपत्ती वाद आणि प्रेम संबंध यामुळे आत्महत्या करणाऱ्या सर्वाधिक घटना नोंदवल्या. त्या वर्षात परीक्षेत अपयश, हातात पैसे नसणे, बेरोजगारी आणि गरीबीमुळे आत्महत्या केल्याच्या कमी घटना होत्या. अहवालानुसार, महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त आत्महत्या करतात. फाशी घेऊन किंवा विष प्राशन करुन बहुतांश आत्महत्या झाल्या.

भारतात आत्महत्येचा दर हा रशिया, जपान, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत कमी आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने चीन, स्पेन, इंग्लंड, इटली आणि ब्राझीलसाठी जारी केलेल्या मानकांच्या तुलनेत भारतात हा दर जास्त आहे.

एनसीआरबीकडून २०१४ पासून कृषी क्षेत्रातील आत्महत्यांची स्वतंत्र नोंद ठेवली जात आहे. २०१६ या वर्षात ६२७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कृषी क्षेत्रात आत्महत्या करणाऱ्या एकूण घटनांपैकी ६२७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे या अहवालात म्हटले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा