नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘डिव्हाइड इन चिफ’ असा उल्लेख करत टाइम मॅगझिनमध्ये लेख लिहिणारे पत्रकार, लेखक आतिश अली तासीर यांचे ओव्हरसीज सिटीझनशीप ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड भारताने रद्द केले. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या आणि मूळ पाकिस्तानी असलेले लेखक आतिशअली तासीर यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी हा वादग्रस्त लेख लिहिला होता. त्यानंतर ‘टाइम’ने पंतप्रधान मोदी यांना ‘यूनिफायर’ असे संबोधत वेगळा लेखही प्रसिद्ध केला होता.आतिशअली तासीर यांनी आपले वडील हे मूळ पाकिस्तानी असल्याचे सत्य कथितपणे लपवल्याचे म्हटले जाते.आतिशअली तासीर यांचे वडील सलमान तासीर हे पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे राज्यपाल होते. सलमान तासीर यांची गोळी मारून हत्या झाली होती.

नागरिकता अधिनियम १९५५ अनुसार, तासीर हे आसीआयसाठी अपात्र ठरले होते. ज्यांचे आई-वडील किंवा आजी-आजोबा पाकिस्तानी असल्यास अशा व्यक्तींना हे कार्ड देता येत नाही, हे याचे कारण असल्याचे गृहमंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने माहिती देताना सांगितले. या कारवाईचा टाइम मॅगझिमध्ये छापून आलेल्या लेखाशी काहीही संबंध नसल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा