पाकिस्तानात होणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जाण्यासंबंधी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना आणखी एक पत्र लिहिले.पहिल्या पत्राला किमान प्रतिसाद द्या अशी अपेक्षा सिद्धूनी व्यक्त केली. वारंवार आठवण करुन दिल्यानंतरही परराष्ट्र मंत्रालयाकडून गुरुद्वारा साहिब कर्तारपूर कॉरिडॉरला जाण्यासाठी परवानगीसंबंधी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

“विलंब आणि कुठलाही प्रतिसाद न मिळणे यामुळे मला पुढचा निर्णयामध्ये अडथळा येतोय. मी कायदा पाळणारा नागरीक आहे. तुमचा नकार असेल तर तसे सांगा मी जाणार नाही” असे सिद्धूने म्हटले. “तुम्ही माझ्या तिसऱ्या पत्राला प्रतिसाद दिला नाहीत तर मी पाकिस्तानला जाण्याची तयारी सुरु करेन. लाखो शीख एलिजेबल व्हिसावर कर्तारपूरला जाणार आहेत” असे सिद्धूने म्हटले.

पाकिस्तानात नऊ नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. पाकिस्तानने या कार्यक्रमाचे नवज्योतसिंग सिद्धू यांना निमंत्रण दिले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा