अयोध्या : अयोध्येमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवल्यानंतर संपूर्ण शहरात ३० बॉम्ब निकामी करणारी पथके तैनात केली.राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा निकाल लवकरच येईल. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्येत कडेकोट बंदोबस्त आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी हा निकाल येण्याची शक्यता आहे.

अयोध्येत हल्ल्याची शक्यता

अयोध्येतील सर्व धर्मशाळा रिकामी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यानुसार मंगळवार रात्रीपासून सर्व धर्मशाळा रिकाम्या असतील. स्थानिक रहिवाशां व्यतिरिक्त कोणालाही अयोध्येमध्ये थांबता येणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली. अयोध्येमध्ये १० नोव्हेंबरपासून सुरक्षा दलांच्या ३०० तुकडया तैनात होणार आहेत. यात केंद्र आणि राज्य सरकारची सुरक्षा पथके असतील.

जाणून घ्या अयोध्या वादाचा घटनाक्रम

वादग्रस्त जागेजवळील राम कोट भागातील रस्ते सुद्धा पोलिसांनी बंद आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सर्तक राहण्याच्या आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याची सूचना केल्या आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा