नवी दिल्ली : गांधी कुटुंबाचे एसपीजी सुरक्षा कवच काढून झेड प्लस सुरक्षा करणार आहे. एसपीजी म्हणजे ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’. या सुरक्षा बदला संदर्भातील निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला.या संदर्भातील वृत्त एका खासगी वृत्त वाहिनीने दिले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांची दोन मुले राहुल, प्रियंका गांधी वढेरा यांना आता झेड प्लस श्रेणीची सुरक्षा असेल. गांधी कुटुंबाला याबद्दल अद्याप माहिती दिलेली नाही असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

हा निर्णय सुरक्षे संदर्भातील आढावा घेतल्यानंतर घेतला. एसपीजी ही पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा संभाळणारी पहिली एलिट फोर्स आहे. यामध्ये ३००० अधिकारी आहेत. एसपीजीकडे आता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी असेल.झेड प्लसमध्ये गांधी कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) असेल.

गांधी कुटुंबाचे एसपीजी सुरक्षा कवच काढण्याच्या निर्णयावरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केली.

एसपीजी सुरक्षा कधीपासून होती?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची १९९१ मध्ये हत्या झाली. तेव्हापासून गांधी कुटुंबाला एसपीजीचे सुरक्षा कवच आहे. पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी १९८५ मध्ये एसपीजी स्थापना झाली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना झाली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला दहा वर्षापर्यंत सुरक्षा देण्यासाठी एसपीजी कायद्यात दुरुस्ती केली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा