मुंबई: बिग बी अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेखाप्रकरणी आता सोनी टीव्हीकडून या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. सोनी वाहिनीने झालेली चूक मान्य करून माफी मागितली. ‘कौन बनेगा करोडपती-११’ च्या एका भागात प्रश्नाचे पर्याय सांगताना अमिताभ बच्चन यांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला.अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केल्याचे म्हणत शिवप्रेमींनी अमिताभ बच्चन यांना जाब विचारत त्यांच्यावर ताशेरे ओढले. अमिताभ बच्चन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरायला लागली. हे प्रकरण अधिक चिघळण्याआधीच सोनी वाहिनीकडून माफीनामा पोस्ट केला.

‘केबीसीच्या कालच्या भागात, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनवधानाने एक चूक झाली, ज्याबद्दल आम्हाला खेद वाटतो आहे.’ असे म्हणत सोनी वाहिनीने जनतेची माफी मागितली.

या कार्यक्रमात गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांना प्रश्न विचारताना वाहिनी कडून ही चूक झाली आणि एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला.

https://www.instagram.com/p/B4l8KNlliwu/?utm_source=ig_web_copy_link
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा