मुंबई : राज्याच्या जनतेने भाजप आणि शिवसेनेला सरकार स्थापनेचा कौल दिला आहे. त्याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यायला हवा. आम्ही तो पेच सोडवू शकत नाही. त्यांनी समंजसपणा दाखवायला हवा, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे माध्यमांशी संवाद साधला.

म्हणून आठवले पवारांना भेटले
शरद पवार हे राज्यातील सर्वात ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. बिघडलेलं राजकीय वातावरण दुरुस्त करण्यात त्यांचा हातखंडा आहे. आताच्या परिस्थितीत काय करायला हवं हा सल्ला घेण्यासाठी मी पवारांची भेट घेतली.

शरद पवार म्हणतात,
आठवले यांनी काळजीतून माझी भेट घेतली. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलेला असल्यानं आमची याबाबतची भूमिका मर्यादित आहे. तुम्हीच सेना-भाजपला समजावण्यासाठी जोमानं प्रयत्न करा, असं मी आठवलेंना सांगितलं.

फेरनिवडणूक होणार का?
फेरनिवडणुकीबाबत राज्यपाल निर्णय घेतील. फारतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. अर्थात, तो निर्णय राज्यपालांचा असेल. त्यावर मी भाष्य करू शकत नाही. पण इतक्या लवकर फेरनिवडणुका होणार नाहीत, असं माझं मत आहे.

काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा चालेल का?
शिवसेनेनं आघाडीला बाहेरून पाठिंबा देऊन सरकार बनवावं भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल, असा नवा फॉर्म्युला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांनी मांडला होता. त्याबाबत बोलताना पवार यांनी, ‘काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा चालणार आहे का,’ असा प्रतिप्रश्न केला.

मसुदा नको, मुख्यमंत्रिपदाचं पत्र द्या : राऊत

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा