मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेनं मुदत ठेवींवरील व्याजाच्या दरात कपातीचा निर्णय घेतला आहे. एमसीएलआर आधारित कर्जाच्या व्याज दरात ०.५ टक्क्यांची कपात केली.नवे व्याज दर १० नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. चालू आर्थिक वर्षांत स्टेट बँकेने ‘एमसीएलआर’ आधारित कर्जाच्या व्याजदरांत सातव्यांदा कपात केली आहे.

नव्या निर्णयामुळे एक वर्षापर्यंतच्या कर्जावरील ‘एमसीएलआर’चे व्याज दर ८ टक्क्यांपर्यंत खाली येणार आहेत. अर्थव्यवस्थेतील तरलता लक्षात घेऊन बँकेने मुदत ठेवींवरील व्याज दरांतही बदल केले आहेत. एक ते दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात ०.१५ टक्क्यांची कपात केली.मोठ्या रकमेच्या ठेवींवर ३० ते ७५ बेसिस पॉइंटची कपात केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा