पुणे : महापालिकेच्या हद्दीपासून आंबिल ओढ्यापर्यंत नाल्यावर असलेल्या पुलामुळे नाल्यामधून वाहणार्‍या पाण्याला अडथळा होत आहे. त्यामुळे हा पूल पाडून पुन्हा बांधावा लागणार असल्याचे एका संस्थेेने अहवालात नमूद केले आहे.

शहरात २५ सप्टेंबर रोजी ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाल्यांना पूर आला. यामध्ये प्रामुख्याने आंबिल ओढ्याचा समावेश होता. महापालिका प्रशासनाने पुराची कारणे शोधण्यासाठी ‘प्रायमूव्ह’ या संस्थेकडून ड्रोन सर्र्वेेक्षण, तसेच सध्याची पाहणी करून अहवाल तयार केला आहे. यातून अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत.

प्रायमूव्ह संस्थेने तयार केलेल्या अहवालानुसार, नाल्यावर अनेक ठिकाणी रस्ते जोडण्यासाठी आणि वाहतुकीसाठी पूल बांधण्यात आले आहेत. अनेक ठिकाणच्या पुलांची उंची कमी आहे. पाणी वाहून जाण्यासाठी पुलाचे डक्ट लहान असल्यामुळे पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. मशिनच्या मदतीने नाले साफ करत असतानासुद्धा पुलांचा अडथळा येत आहे. त्यामुळे हे पूल पाडून पुन्हा बांधण्याची आवश्यकता आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात?आली?आहे. आंबिल ओढ्याच्या पुरामुळे पुलाला अनेक ठिकाणी राडरोडा येऊन अडकला. पाण्याला अडथळा निर्माण झाल्यामुळे इतर भागामध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.

प्रायमूव्ह संस्थेने आंबिल ओढ्याची पाहणी करून अहवाल तयार केला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी नाल्याची रुंदी कमी झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक नाल्याची रुंदी १८ ते २२ मीटरपर्यंत असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी पुलाचे पाणी शिरले त्याठिकाणी नाल्याची रुंदी कमी असल्याचे दिसून येत आहे. नाल्यावर बांधण्यात आलेली उद्यानेसुद्धा अडथळा ठरत असून भविष्यात ही उद्याने काढावी लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बिबवेवाडी येथील पद्मजी पार्क येथील एसआरए प्रकल्प आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले. या ठिकाणी सध्या नाल्याची रुंदी ९.५ मीटर आहे. म्हणजे, रुंदी निम्म्याने कमी आहे. पदमजी पार्क येथील कलव्हर्टची रुंदी ८ मीटर असून ती १८ मीटर करावी लागणार?आहे. सातारा रस्ता येथे बांधण्यात?आलेल्या कलव्हर्टची रुंदी १० मीटर असून १८ मीटर करावी लागणार आहे. सर्वाधिक नुकसान ट्रेजर पार्क याठिकाणी झाले. येथील नाल्याची रुंदी १४ मीटर असून २२ मीटर करावी लागेल. फुलपाखरू उद्यान, बागूल उद्यान येथील नाला १० मीटरचा असून २२ मीटर नाला करणे आवश्यक आहे.

नाल्यांवर अतिक्रमण, डीपी प्रमाणे रेखांकन करणार
अनेक ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विकास आराखड्यामध्ये नाल्याची रुंदी पाहून रेखांकन करण्यात येणार आहे. काही ठिकाणी सोसायट्यांच्या सीमाभिंती नाल्यावर?आल्या असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे झोपड्यांचे अतिक्रमणसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. अतिवृष्टीचा विचार करता नाल्याची रुंदी १८ ते २२ मीटरपर्यंत असणे आवश्यक आहे. मात्र, कोठेच नालाच्या रुंदी याप्रमाणे नसल्याचे निरीक्षणात दिसून येत आहे. त्यामुळे रेखांकन झाल्यानंतर सोसायट्यांनी अतिक्रमण केले आहे का? हे स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा