आपल्या असामान्य प्रतिभेने गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर गारुड करणारे महाराष्ट्राचे लाडके पुलं म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा आज शंभरावा जन्मदिन. पुलं आता आपल्यात नसले तरी त्यांच्या जन्मदिनाला जयंती म्हणणे फार रुक्षपणाचे ठरेल. आपल्या उभ्या कारकीर्दीत त्यांनी रसिकांना चिरकाल टिकणारा आनंद दिला आहे.

चित्रपट, संगीत, लेखन, दिगदर्शन, गायन अशा सगळ्या क्षेत्रांत पुलंनी मनमुराद मुसाफिरी केली. पुलंच्या प्रत्येक कलेप्रमाणे त्यांच्या कथाकथनालाही रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. आजही पुलंनी उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा डोळ्यासमोर जिवंतपणे उभ्या राहतात हीच त्यांच्या सादरीकरणाची ताकद आहे.

त्यांच्या जन्मदिनी ऐका काही लोकप्रिय कथाकथनं

तुम्हाला कोण व्हायचे आहे – मुंबईकर , पुणेकर की नागपूरकर ?
मी आणि माझा शत्रुपक्ष
रावसाहेब
सखाराम गटणे
चितळे मास्तर

मराठीत पहिल्यांदाच पुलंच्या साहित्यकृती ऑडिओबुक्स

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा