इराकमध्ये एक महिन्यापासून सरकारी भ्रष्टाचार आणि बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. आजपर्यंत यामध्ये जवळपास 300 इराकी नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. तर यात जवळपास 2000 नागरिक जखमी झाले आहेत. तेथील परिस्थिती आता इतकी चिघळली आहे की लोक काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नाहीत. तसेच तेथील सरकारही यावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत आहे.

१ ऑक्टोबरला आंदोलनाला सुरुवात
आदेल अब्देल मेहदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. नागरिकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. देशात प्राथमिक गरजा भागण्यात अपयश येत असल्याने राजधानी बगदाद येथे कोणाच्याही नेतृत्वाशिवाय सरकार विरोधात आंदोलनाला सुरुवात झाली.

सरकार पडत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी एका २२ वर्षीय युवकाने, जोपर्यंत आदेल अब्देल मेहदी यांचे सरकार पडत नाही तोपर्यंत एकही आंदोलनकर्ता येथून हलणार नाही. त्यानंतर आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी देशभरातून असंख्य लोक बगदादला पोहचले.

राजकीय व्यवस्था आणि इराणचा हस्तक्षेप

इराकी लोक राजकीय व्यवस्था आणि इराणच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे नाराज आहेत. त्यामुळे इराकमधील हे आंदोलन अलीकडच्या वर्षांमधील सर्वात मोठे आंदोलन आहे. बगदादच्या तहरीर चौकात निदर्शकांची आजही गर्दी असून निदर्शकांनी शहरातील रस्ते आणि शाळा बंद केल्या आहेत.

’सरकारने राजीनामा द्यावा’
मिलिशिया नेते मुक्तादा अल-सद्र यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, जर हे आंदोलन थांबावे असे वाटत असले तर सरकारने राजीनामा द्यावा आणि संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली मध्यावधी निवडणुका घ्याव्यात. याला अध्यात्मिक नेते अयातुल्ला अली सिस्तानी यांनीही पाठिंबा दर्शविला असल्याने सरकारवर दबाव वाढला आहे.

तडजोड करण्यात सरकारला उशीर
सर्व घडामोडींनंतर अखेर सरकार आंदोलकांशी चर्चा करत आहे. मात्र, याला आता उशीर झाला आहे. सरकारमधील काही नेत्यांनी आंदोलकांची भेट घेऊन सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आंदोलक आता काहीही ऐकण्याच्या तयारीत नाहीत.

ओपेकच्या दुसर्‍या क्रमांकाच्या देशात दारिद्र्य
तेल-समृद्ध इराक ओपेकमधील दुसर्‍या क्रमांकाचा तेल उत्पादक देश आहे, परंतु जागतिक बँकेच्या मते इराकमधील पाचपैकी एक जण दारिद्र्य रेषेखाली जगतो आणि तरुणांचा बेकारी दर २५ टक्के आहे.

पंतप्रधान अदेल अब्देल मेहदी यांच्यावर दबाव

पंतप्रधान अदेल अब्देल मेहदी यांच्यावर दबाव
इराकच्या बहुसंख्य शिया लोकांसाठी आदरणीय असणार्‍या सिस्तानींच्या पाठिंब्यामुळे आंदोलकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान आदेल अब्देल मेहदी यांच्यावर दबाव वाढला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा