इस्लामाबाद : कर्तारपूर मार्गिकेचा वापर करून गुरुद्वारा दरबार साहिबला भेट देणाऱ्या भारतीय शीख यात्रेकरूंसाठी पासपोर्टची अट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका वर्षांसाठी शिथिल केली आहे. गुरुद्वाराला भेट देणाऱ्या शीख यात्रेकरूंकडे पासपोर्ट असणे आवश्यक असल्याचे त्यापूर्वी पाकिस्तानच्या लष्कराने जाहीर केले होते.

गुरू नानक यांच्या ५५० व्या जंयतीनिमित्त भारतीय शीख यात्रेकरूंसाठी पासपोर्टची अट एक वर्षांसाठी शिथील केली आहे,असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी येथे माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. त्याचप्रमाणे १० दिवस आधी नोंदणी करण्याची आणि ९ व १२ नोव्हेंबर रोजी प्रत्येक यात्रेकरूकडून २० डॉलर शुल्क आकारण्याची अटही इम्रान खान यांनी रद्द केली आहे. आम्ही हे स्पष्टीकरण भारताकडे दिले आहे, असेही फैझल यांनी सांगितले.

कर्तारपूर कॉरिडॉरवरून पाकिस्तानचा ‘यू टर्न’

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा