मुंबई : भाजप शिवसेनेमधला सत्तेचा तिढा सोडवण्याचे प्रयत्न भाजपच्या पातळीवर सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे संतापलेल्या सेनेला भाजप नवा मसुदा देण्याची चर्चा माध्यमांमध्ये होती. त्यावर बोलताना राऊत यांनी, ‘आम्हाला मसुदा नको मुख्यमंत्रिपदाचं पत्र द्या’ अशी भूमिका घेतली आहे. आता हा तिढा सुटतो का आणखी गुंततो याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.

सकाळच्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले राऊत?

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, हा शिवसेना आणि भाजपचा प्रश्न आहे. यात तिसऱ्यांनी मध्ये येण्याची गरज नाही आणि त्याचा उपयोगही होणार नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा लेखी प्रस्ताव कोणी घेऊन येणार असेल तर बोला. मी उद्धव ठाकरे यांना तशी माहिती देईन.

दिल्लीपुढे झुकणार नाही
महाराष्ट्रात घोडेबाजाराची भीती वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शक कारभाराला दिलेलं ते आव्हान आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात कुठलाही पॅटर्न चालणार नाही. न्याय व अस्मितेची आमची लढाई सुरूच राहील. आमच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नाही. आमचा चेहराही काळवंडलेला नाही. दिल्लीपुढे कोणीही झुकणार नाही. शरद पवार झुकले नाहीत आणि उद्धव ठाकरेही झुकणार नाहीत.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र
जास्तीत जास्त काळ ‘काळजीवाहू’ बनून सूत्र हलवण्याचे डावपेच व कटकारस्थानं राज्यात सुरू आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचंही षडयंत्र सुरू आहे. जनतेनं बहुमत न देताही राज्य करायचं हा ‘न मिळालेल्या’ जनादेशाचा अपमान आहे. घटनेचा व कायद्याचाही अपमान आहे. मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागेल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा